murder 
विदर्भ

कुख्यात गुंडाच्या हत्येने हादरले तुमसर, व्यापाऱ्यांकडून करायचा हप्तावसुली 

सकाळवृत्तसेवा

तुमसर (जि. भंडारा) : येथील कुख्यात गुंडाचा निर्घृण खून करण्यात आल्याने तुमसर शहरात शनिवारी एकच खळबळ उडाली. विकास गिलोरकर उर्फ डुबली असे मृत गुंडाचे नाव आहे. त्याच्या हप्तावसुलीमुळे तुमसरवासी चांगलेच कंटाळले होते. त्याची अचानक हत्या झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. 

तुमसर शहर संपूर्ण विदर्भात गुन्हेगारीकरिता कुप्रसिद्ध शहर आहे. दर दोन महिन्यात येथे एखादा मोठा गुन्हा घडतच असतो. त्यामुळे संपूर्ण विदर्भात तुमसर शहर गुन्हेगारी साठी ओळखला जातो. 

शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गौतमनगर भागात अज्ञात व्यक्त ीने अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विकासच्या गळ्याच्या तिक्ष्ण हत्याराने वार केले. हल्ला केल्यानंतर अज्ञात आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. भररस्त्यात विकास गंभीर जखमी अवस्थेत तडफडत होता. विकास गुंड प्रवृत्तीचा असल्याने कुणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमी विकासला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. विकासच्या हत्येप्रकरणी बातमी लिहेपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. 

खर्ऱ्याकरिता केला होता खून 
विकास उर्फ डुबली हा सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता. त्याने यापूर्वी हत्येसारखा गंभीर घटना केल्या आहेत. बाजारात जाऊन कपडा व सराफा व्यापाऱ्यांना धमकावून हप्तावसुली करायचा. वर्षभरापूर्वी विकासने भरदिवसा एका कपडा व्यापाऱ्याला धमकावण्याचा प्रयत्न केला असता सर्व व्यापाऱ्यांनी मिळून त्याला चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. विशेष म्हणजे, विकासने एकदा तर खर्ऱ्याकरिता एकाचा दगडाने ठेचून खून केला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी भारतीय महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? ; भेटीची तारीख ठरली!

HSC Exam Form : बारावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्काने भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Pune Crime : 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी; घरझडतीत ५१ लाखांची रोकड जप्त

Ganesh Kale Murder Case: सोशल मीडियात गणेश काळेच्या हत्येचं समर्थन; बंदुकांसह काडतुसे सोबत ठेवून फोटो

Latest Marathi News Live Update : आर्थिक दुर्बल ग्राहकांना २५ वर्षे माेफत वीज

SCROLL FOR NEXT